Tuesday , September 17 2024
Breaking News

पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द; बाल हक्क मंडळाचा महत्त्वाचा निर्णय

Spread the love

 

पुणे : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात राहावं लागणार आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलिस ठरवतील असंही बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे.

दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतल्यानंतर अवघ्या 15 तासांमध्येच त्या अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता. त्यामुळे नागरिकांतून एक प्रकारची नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा नवीन कलम लावलं आणि त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला.

बुधवारी सकाळी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला कोर्टात हजर केलं. त्यावेळी युक्तीवाद करत असताना पोलिसांनी मुलगा दारु प्यायला होता हे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अल्पवयीन मुलाने कोझी किचन हॉटेलमध्ये भरलेलं 48 हजार रुपयांचे बीलही कोर्टासमोर सादर केलं. तर तिकडे बचावपक्षाच्या वकिलांनी मुलगा अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तीवाद झाल्यानंतर न्यायलायनं आदेश दिला.

हा मुलगा अल्पवयीन असल्याचं आरोपीच्या वतीने युक्तीवाद केला. तर या आरोपीने केलेलं कृत्य हे अत्यंत भीषण असं आहे, त्यामुळे त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांच्या वतीनं करण्यात आली.

पोलिसांनी नव्या कलमाची वाढ केली
पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी नव्या कलमाची वाढ केली आहे. त्यानंतर अल्पवयीन आरोपी मुलाने कोर्टात हजेरी लावली आहे.

मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावर 185 कलमाच्या अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी त्याच्यावर कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अल्पवयीन असल्याच्या कारणावरुन न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. या मुलाला दुपारी 12 वाजता बाल हक्क कोर्टासमोर हजर करण्यात आले. तर
आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना अटक करण्यात आली असून त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अल्पवयीन आरोपीची केवळ 15 तासांच्या आत जामीनावर सुटका झाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिल्पकार जयदीप आपटेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

Spread the love    सिंधुदुर्ग : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्याच्या प्रकरणात फरार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *