निपाणी (वार्ता) : शैक्षणिक कार्यासाठी कार्यरत असलेल्या भोपाळ येथील एकलव्य फाउंडेशनतर्फे देशभरातील विज्ञान शिक्षकासाठी विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान शिक्षकांचे मूलभूत ज्ञान व प्रायोगिक कौशल्यामध्ये वाढ करण्याच्या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली आहे.
सोमवार (ता.१०) ते शनिवार पर्यंत (ता.१५) भोपाळ येथे होणाऱ्या कार्यशाळेसाठी चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातून भोज येथील न्यू सेकंडरी हायस्कूलचे विज्ञान शिक्षक दिलीप शेवाळे व निपाणीमधील संभाजीनगर मराठी शाळेचे विज्ञान शिक्षक एस. एम. नदाफ यांची निवड झाली आहे.
कार्यशाळेत देशभरातील शास्त्रज्ञ व विज्ञान क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
या निवडीसाठी चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याचे डीडीपीय मोहनकुमार हंचाटे, डायटचे प्राचार्य मोहन जिरगीहाळ, विज्ञान विषयाचे पर्यवेक्षक हरिदास खाडे, डायट लेक्चरर संजय यादगुडे, निपाणीच्या गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, बीआरसी प्रमुख राजू कागे, सीआरपी बन्ने, मुख्याध्यापक एस. व्ही. केसरकर व सी. एम. सुगते यांचे सहकार्य लाभले.