राजू पोवार ; तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : तालुक्यातील काही गावातील तलाठी व सर्व्हे अधिकारी चुकीची नावे जोडत आहेत. तसेच वारसा व इतर कामासाठी रक्कम घेतली जात आहे. अशा तलाठी व सर्व्हे अधिका-यावर कायदेशीर कारवाई करावी. याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध समस्या तात्काळ निकालात काढा, अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रयत संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला.
यावेळी विविध समस्यांचे निवेदन तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांना राजू पोवार व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. तहसीलदार बळीगार यांनी निवेदन स्वीकारून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले
निवेदनातील माहिती अशी, ऊसाच्या शेतात विद्युत वाहिन्यामुळे शॉर्टसर्किट होऊन जळलेल्या ऊसाच्या नुकसान भरपाईसाठी जैनवाडी, बेनाडी, मानकापूर येथील शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. सौमित्रच्या वेबसाइटवर सौर शेती पंपांसाठी अनुदानित रकमेवर शेतकऱ्यांना सौर पंपसेट वितरित केले जात आहेत. सौमित्र यांच्या संकेतस्थळावर निपाणी विभागातील सदलगा येथे १४ गावांचा समावेश आहे. या गावांचे फॉर्म न भरल्याने सर्व्हे नंबरमधील शेअर नंबर ओपन होत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही.
साखर कारखान्याकडून प्रति टन ३५०० आणि सरकारकडून २००० असे ५५०० मिळाले पाहिजेत. महाराष्ट्राच्या सीमाभागातील साखर कारखान्यांप्रमाणेच कर्नाटकातील कारखान्यांनीही दर द्यावा.
निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार उशिरापर्यंत उपलब्ध नसल्याने बबन जामदार, सर्जेराव हेगडे, बाळासाहेब ऐवाळे, प्रबोधन माळी यांनी धिक्कार केला.
यावेळी बाबासाहेब पाटील, मयूर पोवार, आप्पासाहेब पाटील, पांडुरंग हरेल, सर्जेराव टि.के. पाटील, मलगोंडा तावदारे, प्रतीक पळगे, प्रकाश चव्हाण, अभिजीत देसाई, सम्मेद चिलाई, संजय नेजे, सुभाष चौगुले, शिवाजी कासुटे, बाहुबली मेक्कळके, बाबासाहेब निगवे, प्रकाश घाटगे, अशोक यादव, कुमार पाटील, शामराव साळुंखे, दिनकर भिलुगडे, जयपाल गोरवाडे, प्रवीण कोंडेकर, रवी पाटील, राजू निकम, जयदीप कोंडेकर यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.