अध्यक्ष एम. एल. चौगुलेः ‘रवळनाथ’तर्फे गुणवंताचा सत्कार
निपाणी (वार्ता) : नोकरदारांच्या गरजेतून रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीची स्थापना झाली. सुरुवातीपासूनच सामाजिक बांधिलकीचे व्रत आणि सहज-सुलभ अर्थसहाय्याचे धोरण, विनम्र व तत्पर डिजिटल सेवा आणि पारदर्शक कारभार हेच सूत्र जपल्यामुळेच अल्पावधितच संस्था देशपातळीवर पोहचली आहे, असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी व्यक्त केले. निपाणी येथील आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
शाखा सल्लागार प्रा. डॉ. शिवाजीराव होडगे यांची मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य निवड झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांच्या हस्ते तर येथील तुषार माळी यांनी दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या जागतिक हिल मॅरेथॉनमध्ये विक्रमी कामगिरी केल्याबद्दल शाखा अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्र. प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे व तुषार माळी यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संचालक महेश मजती, माजी शाखा सल्लागार महावीर मरजे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास शाखा सल्लागार प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे रावसाहेब जनवाडे, शाखाधिकारी सचिन चौगुले, अकौंटंट शिवानंद काळे यांच्यासह सभासद, कर्मचारी उपस्थित होते. व्ही. आर. पाटील यांनी स्वागत केले. सल्लागार प्रशांत रामनकट्टी यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. डॉ. प्रविणसिंह शिलेदार यांनी यांनी आभार मानले.