निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रघुनाथराव घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुशाप्पा पाटील उपस्थित होते.
सचिव अशोक तोडकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दादासो पाटील यांनी प्रास्ताविकात संघाच्या कार्याचा आढावा घेतला.
मासा बेलेवाडी येथील निवृत्त शिक्षण केंद्र प्रमुख कुशाप्पा पाटील यांनी, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईबरोबरच शिक्षकांचेही योगदान तितकेच महत्वाचे आहे. या दोघांशिवाय आयुष्य अपूर्ण असते. आई जन्म देते, मुलांसह घरातील सर्वांचा सांभाळ करते व घरातील सदस्यांसाठी आयुष्य खर्ची घालते. जीवनात एखादी व्यक्ती यशस्वी झाली तर ते यश हे प्रथम आईचे असल्याचे सांगितले. संजय कांबळे, रामा पोवार, काका पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. संघाचे सदस्य आर. एम. चौगुले यांनी धार्मिक स्थळाबाबत माहिती दिली. कार्यक्रमात गुरुजन आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. जयसिंग चौगुले, नारायण लोहार, संजय जोशी यांच्यासह संघाचे सदस्य, महिला व नागरिक उपस्थित होते.