खानापूर : मराठा मंडळ पदवी कॉलेजजवळ असलेल्या खानापूर-बेळगाव महामार्गावरील पुलाखाली असलेल्या संपर्क रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुभाजकला दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबतची माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हलकर्णी गावातील निखिल नागेंद्र उर्फ नागो गुंजीकर (वय 22) हा दुचाकीस्वार युवक बेळगावहून खानापूरकडे येत असताना रात्री 10.30 च्या सुमारास मराठा मंडळ पदवी कॉलेजजवळ असलेल्या खानापूर-बेळगाव महामार्गावरील पुलाखाली असलेल्या संपर्क रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुभाजकला दुचाकी आढळली यात निखिल गंभीर जखमी झाला होता. नेमके त्याचवेळी बजाज शोरूमचे मालक पिंटू साळुंखे आपल्या कुटुंबासह बेळगावहून खानापूरकडे येत असताना त्यांनी सदर घटना पाहिली व गंभीर जखमी युवकास रुग्णवाहिकेतून खानापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. त्या ठिकाणी प्रथमोपचार करून त्याला त्याच्या वडीलासोबत बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचाराचा उपयोग न होता रात्री दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते. निखिलच्या अपघाती निधनामुळे हलकर्णी व खानापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आकाली मृत्यूने तर थैमानच मांडले आहे.
फार मन कासावीस करणार घटना.
ईश्वर निखीलला सद्गती देवो.