बेळगाव : बेळगावात कर्नाटकातील विविध संघटना, शेतकरी संघटना, कामगार संघटना, अंगणवाडी सेविकांच्या संघटना, सीआयटीसह अनेक संघटनांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आंदोलन छेडून राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत कॉर्पोरेट कंपन्यांना संधी देणाऱ्या सरकारविरोधात रोष व्यक्त केला.
यावेळी बोलताना शेतकरी नेते सिद्धाप्पा मोदगी म्हणाले, कॉर्पोरेट कंपन्यांनी भारत सोडावा यासाठी 1942 मध्ये महात्मा गांधींनी 09 ऑगस्ट रोजी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात आंदोलन सुरू केले, कॉर्पोरेट कंपन्यांकडून शेतकऱ्यांना संरक्षण मिळत नाही, शेतकरी देशात गरीबच राहतात. लोकप्रतिनिधींमुळे महत्तम गांधींची ग्रामस्वराज्य कल्पना आजचे लोकप्रतिनिधी मातीमोल करत आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.