दिग्विजय युथ क्लबतर्फे क्रांती दिन
निपाणी (वार्ता) : शेजारील देशांमध्ये अराजकता निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत स्वातंत्र्याचे मोल करणे आवश्यक आहे. जात,पात पंत, भाषा, धर्मभेदाला बाजूला ठेवून प्रत्येक भारतीय नागरिकांनी कर्तव्यदक्ष राहिले पाहिजे. क्रांतिकारकांनी आपल्या लढ्याद्वारे देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे मत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्त केले. येथील बेळगाव नाक्यावरील हुतात्मा स्मारकाजवळ दिग्विजय युथ क्लबतर्फे शुक्रवारी (ता.९) आयोजित क्रांती दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. अच्युत माने म्हणाले, क्रांतिकारकांनी चळवळ उभी केल्याने इंग्रजांना देश सोडावा लागला. त्यात अनेकांनी हौतात्म्य पत्करल्याने स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे अशा क्रांतिकारकांचे विस्मरण होऊ देऊ नका. क्रांतिकारकांनी अभूतपूर्व लढा दिला आहे. त्यामुळे अन्यायाविरोधात चळवळींचे पुनरुज्जीवन व्हावे. प्रत्येकाने आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगून समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
क्लबचे संस्थापक अध्यक्ष दीपक इंगवले यांनी स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते अनिल संत, अशोक तोरस्कर यांच्या हस्ते स्मारकाचे पूजन तर उद्योजक सुधाकर कुऱ्हाडे यांनी यांनी ध्वजारोहण केले. प्रा. सुरेश कांबळे, सुधाकर माने यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक शंकर हिरवे, बाबासाहेब खांबे, राजशेखर जडी, रविंद्र पावले, उमेश भोपे, ओंकार घोडके, संदिप पाटील, स्वाती दबडे, लतिका दैव, अमृता संकपाळ, अशोक राऊत, प्रा. आनंद सकपाळ, बाबूराव भोपळे, शंकर गळतगे, मोहन जाधव, रजनीकांत बाचनकर, आप्पा खोत, सदरुद्दीन नदाफ, इम्तियाज मकानदार, उत्तम लोहार, राजशेखर शिंत्रे, बाळासाहेब जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
भारतीय नागरिकांनी दक्ष राहायला हव……….।
एकदम बरोबर , नाहितर ,” जागा देवून जागत रहाण्याची वेळ भारतीय नाहितर येवू शकते.