चंदगड : शासनाकडून बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र या विविध योजनांचा लाभ, मुख्य, मूळ प्रामाणिक बांधकाम कामगारांच्या पर्यंत पोचविले जात नाहीत, याचे लाभ बोगस लाभार्थी, तसेच काही राजकीय नेते, पक्ष, एजेंट करीत असून आपल्या मर्जीतील बिगर कामगार लोकांना करून देत असून त्याचा परिणाम मूळ बांधकाम कामगार या विविध योजनांपासून उपेक्षित, वंचित राहिला राहत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेतकरी कामगार परिवार संघाचे भाई नारायण वाईंगडे, समाजसेवक नरसू शिंदे यांनी आज पाटणे फाटा ता. चंदगड येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजनांची होणारी लूट, चोरी थांबवून दोषीवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणी करण्यात यावी व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा यासाठी हे उपोषण करीत असल्याचे भाई नारायण वाईंगडे यांनी सांगितले.
याबाबतचे निवेदन चंदगड तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना देण्यात आली आहेत. प्रा. नागेंद्र जाधव, संदिप भोगण, संदिप सकट, संभाजी पाटील, परशराम साळुंखे, शिवाजी नाईक, संदिप पाटील, जक्काप्पा पाटील, बापू सावंत, प्रकाश कोल्हाळ आदी मान्यवरांनी या उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला.