डॉ. एम. बी. शेख; कुर्ली हायस्कूलमध्ये नवीन वर्ग खोल्यांचा पायाभरणी
निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्था ही सर्वात मोठी शिक्षण संस्था असून गुणवत्तेच्या बाबतीत रयतमध्ये कधीही तडजोड केली जात नाही. काळानुसार शिक्षणासाठी आवश्यक विविध प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात रयत शिक्षण संस्था नेहमी अग्रेसर असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. बी. शेख यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात शिक्षक आमदार प्रकाश हुक्केरी यांचा आमदार निधी ५० टक्के व संस्था निधी ५० टक्क्यांमधून मंजूर झालेल्या दोन खोल्यांच्या पायाभरणी समारंभात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. सहाय्यक विभागीय अधिकारी ए. ए. डिसोझा यांनी शिक्षक आमदार प्रकाश हुक्केरी यांचे शैक्षणिक क्षेत्रासाठीचे कार्य अभिमानास्पद असल्याचे सांगितले. स्कूल कमीटी सदस्य अरुण निकाडे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी हुन्नरगीचे माजी ग्रामपंचायत पंचायत अध्यक्ष दादासाहेब पाटील, सुपरवायझर संग्राम महाडिक, विठ्ठल मगदूम कोल्हापूर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. डॉ. एम. बी. शेख यांनी संस्थेकडून इमारत बांधकामसाठी कुर्ली शाखेला १५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. यावेळी स्कूल कमिटी सदस्य अरुण निकाडे, संजय शिंत्रे, सीमा पाटील-कोल्हापूर, रामचंद्र निकाडे, रघुनाथ चौगुले, के. डी. पाटील, दादासाहेब पाटील, अमर शिंत्रे, सुभाष निकाडे, लक्ष्मण आबने, नामदेव निकाडे, शिवाजी चौगुले, कुमार माळी, सीताराम चौगुले, सुधाकर व्हराटे, शिवाजी मगदूम, मलगोंडा पाटील, महादेव बन्ने, काकासाहेब डोंगरे, आप्पासाहेब लोकरे, विलास पाटील, डी. एस. चौगुले, संभाजी पाटील, सिदगोंडा शेडबाळे, बी. एस. पाटील, दिलीप पाटील, बी. एस. हेरवाडे, नंदकुमार खोत, लक्ष्मण यादव, आनंदा ढगे, टी. पी. कांबळे, आर. बी. मगदूम, जे. एस. वाडकर, सागर यादव, विपुल कमते, कृष्णात निकाडे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. ए. ए. चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. टी. एम. यादव यांनी आभार मानले.