खानापूर : खानापूर तालुक्यातील मेरडा येथील रहिवासी व माजी आमदार अरविंद पाटील यांचे वाहन चालक संतोष परशराम मादार (वय 46) यांचे रात्री अपघाती दुःखद निधन झाले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दोन दिवसापूर्वी संतोष मादार हे आपल्या दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात असताना नंदगड-नागरगाळी मार्गावर हलशी गावापासून काही किलोमीटर अंतरावर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचाराचा उपयोग न होता सोमवारी रात्री 8.30 वाजता निधन झाले.
संतोष मादार हे माजी आमदार अरविंद पाटील यांच्या अगदी जवळचे विश्वासु व्यक्ती होते. त्यामुळे तालुक्यातील सर्वांच्या परिचयाचे होते. तसेच त्यांचा स्वभाव ही मनमिळावू होता. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. अंत्यसंस्कार मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता मेरडा या ठिकाणी होणार आहेत.
नादुरुस्त रस्त्याचा बळी…
हलशी-नागरगाळी रस्ता संपूर्ण उखडून गेला असून, पीडब्ल्यूडी खात्यांनी याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे या ठिकाणी बरेच अपघात होत आहेत. संतोष मादार यांचा बळी या रस्त्याने घेतला असून, याला संपूर्णपणे पीडब्ल्यूडी खाते जबाबदार आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
माहिती नाहि हे ,”हे रस्त्यातील खड्डे कि खड्यातील रस्त्ये आजून किती निष्पाप जीवांचे बळी घेतील.
फार च गंभीर विषय आहे हा आजच्या भारतातला तेंव्हा यावर आता नागरिकांनी जोरदार निषेध केलाच पाहिजेच.
वंदेमातरंम।