बेळगाव : सन्मित्र मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड येळ्ळूर यांच्यावतीने रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर स्पर्धेत एकूण 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा गव्हर्नमेंट मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक श्री. वाय. सी. गोरल होते. प्रास्ताविक व्हा. चेअरमन सतीश पाटील यांनी केले तर स्पर्धेबद्दल माहिती चेअरमन श्री. राजू पाटील यांनी दिली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून येळ्ळूरचे प्रसिद्ध चित्रकार श्री. महेश होनुले व पेडणेकर होते. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना येत्या 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी गौरविण्यात येणार आहे असे सोसायटीतर्फे कळविण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, सल्लागार, मार्गदर्शक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. महेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर शेवटी आभार चेतन हुंदरे यांनी मानले.