अध्यक्ष उत्तम पाटील : वार्षिक सर्वसाधारण सभा
निपाणी (वार्ता) : शासकीय अडचणीमुळे काही वर्षांपूर्वी बंद पडत असलेल्या बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाला दिवंगत सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्यासह संचालक व सभासदांच्या प्रयत्नाने उर्जितावस्था मिळाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. आर्थिक वर्षात १ कोटी ४३ लाख १९ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली. बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची ४८ वी वार्षिक सभा अरिहंत सभागृहात सोम सोमवारी (ता.१५) झाली. त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी संचालक राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
अध्यक्ष उत्तम पाटील म्हणाले, संघाचे २ हजार ९८३ सभासद, २ कोटी ३८ लाखावर भाग भांडवल, ८ कोटी ५८ लाखावर निधी, ४५ कोटी २५ लाखावर ठेवी, २३ कोटी ६९ लाख ७ हजाराची बँक शिल्लक,३ कोटी ९४ लाखावर गुंतवणूक, १६ कोटी ७२ लाख ८२ हजारावर बँक कर्ज,४१ कोटी ४५लाखावर एकुन कर्ज दिले असून त्याची शंभर टक्के वसुली केली आहे. त्यामुळे संघाला यावर्षी १ कोटी २८ लाख ६४ हजारावर नफा झाला आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संघाला सलग ७ वर्षे ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे.
व्यवस्थापक आर.टी. चौगुले यांनी नफा तोटा पत्रकाचे वाचन केले.
यावेळी, अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, पृथ्वीराज पाटील, संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड्ड, संचालक राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, राजेंद्र ऐदमाळे, बाळासाहेब सातपुते, प्रवीण पाटील, राजीव गजरे, सुनीता बंकापुरे, प्रवीण पाटील, तैमूर मुजावर, राजू गजरे, मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी रावसाहेब चौगुले, नगरसेवक अभय मगदूम, जावेद मकानदार, पिंटू कांबळे, प्रदीप माळी, रोहित माने, दिगंबर कांबळे, तुलसीदास वसवाडे, अशोक माळी, नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपाध्यक्ष भारती वसवाडे, अरिहंत संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष शेट्टी, डॉ.शंकर माळी, अशोक बंकापुरे, बाबासाहेब निकम, निरंजन पाटील, गजानन कावडकर अशोक अम्मनावर, रोहित पाटील, बी.जे. पाटील, मुख्य कारण निर्वाह कार्यकारी रावसाहेब चौगुले यांच्यासह संघाचे सदस्य नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.