खानापूर : हेमाडगा व्हाया मणतूर्गा पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन आज खानापुर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदरी रस्ता फॉरेस्ट नाक्याच्या नवीन बांधलेल्या C.D. पासुन ते हारुरी गावच्या जोड रस्त्याच्या अलीकडे प्रयंत 600 मीटर त्यानंतर हलात्री नदीच्या पुलानंतर ते मणतूर्गा गावच्या जोड रस्त्याच्या अलीकडे प्रयंत 600 मीटर करण्यासाठी 1 कोटी 55 लाख अनुदान मंजुर करण्यात आले आहे, या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती, यामुळे येथुन येणाऱ्या जाणाऱ्या या भागातील जनतेला कसरत करावी लागत होती, तरी या रस्त्यासाठी या भागातील नागरिकांनी व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी 2016 पासुन ते जुलै 2024 प्रयंत अनेक वेळा पाठपुरावा केलेला होता. जुलै महिन्यात विद्यमान आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळ यांना सांगितले होते की, पावसाळा संपल्यावर लगेचच रस्त्याला कामाला सुरवात करतो त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज कामाला सुरवात केली, त्याबद्दल या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या भूमिपूजन कार्यक्रमासाठी या भागातील माजी तालुका पंचायत सदस्य श्री. बाळासाहेब शेलार, समितीचे सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी, कृष्णा गुरव, आपु गांवकर, मषणू गुरव, रमेश चव्हाण, रमेश गुरव, मऱ्याप्पा पाटील, संभाजी पाटील, झेंडे, यलाप्पा पाटील, किशोर हेब्बाळकर, नारायण काटगाळकर हे उपस्थित होते.
यावेळी भाजप अध्यक्ष बसवराज सानिकोप, माजी अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते सदानंद पाटील, प्रमोद कोचेरी, तसेच कॉन्ट्रॅक्टर धामणेकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भरमा साहेब हे सुद्धा उपस्थित होते.