खानापूर : खानापूर येथील दि. खानापूर माध्यमिक तालुका शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ताराराणी हायस्कूलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन श्री. अजित सावंत होते.
विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने सभेची सुरुवात करण्यात आली. यानंतर संस्थेचे ज्येष्ठ सभासद संस्थेचे मार्गदर्शक निवृत्त मुख्याध्यापक सलीम कित्तूर व संचालक उपस्थित मुख्याध्यापकांच्या यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे जेष्ठ संचालक मुख्याध्यापक श्री. अनिल कदम यांनी सर्व सभासदांना शुभेच्छा देत संस्थेच्या प्रगतीबद्दल व नवनवीन योजनाबद्दलची माहिती आपल्या प्रस्ताविकेतून सादर केली. सर्व मान्यवर व सभासदांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी 2023- 24 या शैक्षणिक वर्षात निवृत्त झालेले मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी, यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हास्तरीय पुरस्कृत तसेच खानापूर तालुका व बेळगाव तालुका आदर्श शिक्षकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. संस्थेचे सेक्रेटरी श्री. टी. आर. पत्री यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत ताळेबंद पत्रक, अंदाजपत्रकाचे वाचन केले. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून निवृत्ती मुख्याध्यापक सलीम कित्तूर यांनी संस्थेच्या सुरुवातीच्या काळाची आठवण करून देत संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. अजित सावंत म्हणाले की, संस्थेच्या प्रगती आणि उन्नतीमध्ये सभासद हा केंद्रबिंदू असतो. सभासद हाच संस्थेच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा असतो, योग्य आणि प्रामाणिक व्यवस्था टिकवून संस्थेची यशस्वी वाटचाल करणे हाच उद्देश महत्त्वाचा ठेवून सर्वांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या निमित्ताने सभासदांच्या गुणी मुलांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष बी. व्ही. पूजार, संचालक श्री. एम. एस. आरगू, एम. बी. हेरूर, एम. वाय. अजपनावर, टी. एस. बोकडेकर, एस. एम. राठोड, एम. एन. बस्तवाडकर, सौ. एम. एस. तंगडे, श्रीमती. एस. एस. तीरवीर उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालक जी. एस. धामणेकर व व्ही. डी. पुजार यांनी केले.