Friday , November 22 2024
Breaking News

विसर्जन मिरवणूक अपघातातील जखमीचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान कपिलेश्वर उड्डाण पुलावर घडलेल्या ट्रॅक्टर अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते. दुर्दैवाने त्यातील एका जखमीचा आज सोमवारी दुपारी मृत्यू झाला.
उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांचे नाव विजय यल्लाप्पा राजगोळकर (वय 56) असे असून तेग्गीन गल्ली वडगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

मयत विजय हे श्रीगणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेले असता विसर्जन मिरवणूकीदरम्यान कपिलेश्वर उड्डाणपुलावर श्रीमुर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला होता. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर विजय हे गंभीररित्या जखमी झाले होते. अपघातात जखमी झालेल्या विजय यांच्यासमवेत अन्य एका अपघातग्रस्तावर बेळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर मयत विजय यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अन्यत्र खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविले होते मात्र उपचारादरम्यान श्री. विजय यांचा आज दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विजय यांच्या निधनाने तेग्गीन गल्लीसह वडगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी व अध्यक्ष यांनी घटनास्थळी भेट दिली आणि जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले व त्यांच्या पुढील उपचाराची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र विजय यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अन्यत्र खाजगी दवाखान्यात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यावेळी त्यांनी महामंडळाकडे आर्थिक मदतीची विनंती केली त्यानुसार महामंडळाच्या अध्यक्षांनी कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊ केली तसेच बेळगाव शहरातील गणेशोत्सव मंडळांना देखील विनंती करण्यात आली आहे. अपघातग्रस्त कुटुंबीयांना गणेश मंडळांकडून आर्थिक सहाय्य करण्यात यावे, असे आवाहन पुन्हा एकदा गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना

Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *