Tuesday , June 2 2026
Breaking News

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतले श्री रेणुका मातेचे दर्शन

Spread the love

 

बेळगाव : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थानाला मोठ्या संख्येने भाविक देवी दर्शनासाठी येत आहेत. याच काळात बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज सोमवारी सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

यानंतर जिल्हाधिकारी रोशन यांनी सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य यांच्याशी रेणुका देवस्थान परिसरात हाती घेण्यात येत असलेल्या विविध विकासकामांबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुलेद, श्री रेणुका देवस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी एबीपी महेश आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बालवीर विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Spread the love  बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेत नवीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *