बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज विजयदशमीच्या मुहूर्तावर श्री दुर्गामाता दौडीची सांगता करण्यात आली. प्रारंभी मारुती मंदिर मारुती गल्ली येथे भल्या पहाटे धारकरी फेटा बांधून घेण्यास रांगेत उत्साहाने उपस्थित होते. यावेळी मारुती मंदिर येथे प्रमुख पाहुणे म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचे अकरावी वंशज ह. भ. प. श्री शिरीष महाराज मोरे देहूकर, व्याख्याते सौरभ करडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. यावेळी वकील श्यामसुंदर पत्तार उपस्थित होते. त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून श्री दुर्गा माता दौडीला चालना देण्यात आली. पुढे ही दौड मारुती गल्ली, देशपांडे गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, कोनवाळ गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, कंग्राल गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली करत ही दौड आपल्या ठरलेल्या सांगता समारोपाच्या ठिकाणी ध.संभाजी महाराज चौक येथे आली.
प्रारंभी व्यासपीठावरील छ. शिवाजी महाराजांचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे ह. भ. प. शिरीष महाराज मोरे यांचा सत्कार प्रांतप्रमुख श्री. किरण गावडे यांनी केला. तसेच शिवव्याख्याते सौरभ दादा करडे यांचा सत्कार जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केला. तसेच वकील शामसुंदर पत्तार यांचा सत्कार शहर प्रमुख अनंत चौगुले व तालुकाप्रमुख परशराम कोकितकर यांनी केला. यानंतर दुर्गामाता दौड संदर्भात प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. 25 वर्ष आधी बेळगाव मधील केवळ 23 शिवभक्तानी मिळून ही दुर्गामाता दौड चालू केली. त्या पेरलेल्या बी च रूपांतर आज मोठ्या वटवृक्षात झाले आहे. आणि येत्या काळात हे आणखीन वाढणार. हे लक्षात घेता पुढच्या वर्षी दुर्गा माता दौडीच्या मार्गामध्ये काही बदल करण्यात येतील अशी सूचना यावेळी करण्यात आली. त्यानंतर शिवव्याख्याते सौरभ करडे यांनी हिंदवी स्वराज्य खडा पहारा यावरती उपस्थिताना मार्गदर्शन केले. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली. त्यांनी अनेक विषयावर उपस्थितांचे लक्ष वेधले. यामध्ये विशेषता त्यांनी कशा पद्धतीने यवनी आक्रमकानी आपली मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद उभी केली याबद्दल त्यांनी माहिती दिली. आज हिंदूंच्या विरुद्ध होणारा लव जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद कसा फोफावतोय याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. कशा पद्धतीने या गोष्टी आपल्या विरुद्ध केल्या जातात. आजपर्यंत हिंदुस्थानात अनेक आक्रमणे झाली. हिंदूंची मंदिरे लुटली गेली. आया बहिणींची अब्रू दिवसाढवळ्या लुटली गेली. पण कोणत्याही राज्यकर्त्याला असं वाटलं नाही की आपण हे थांबवावं आणि हिंदूंचे रक्षण करावं. ते केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या जिजाऊ माँसाहेबांना वाटलं. याच नवरात्र उत्सवात आई तुळजाभवानी कडे नवस बोलला. की यवनांचा नाश करणारा पुत्र मला दे. आणि तेच मागणं मागण्यासाठी आज तुम्ही गेले नऊ दिवस दुर्गा माता दौडीत आपण भाग आहात. हे समोर असणार भगव वादळ मी पाहून थक्क झालोय. इतक्या प्रचंड संख्येमध्ये आपण या दौडीत सहभागी होता याबद्दल आपलं भरपूर कौतुक आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक हिंदूंनी सावधान राहिले पाहिजे असे सूचक वक्तव्य सुद्धा महाराजांनी उपस्थिताना केले.
यावेळी विश्वनाथ पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. यानंतर आरती करून ध्येयमंत्र म्हणण्यात आला व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उतरून यावर्षीच्या दौडीची सांगता करण्यात आली. व्यासपीठावर प्रांत प्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर उपस्थित होते.