Saturday , March 22 2025
Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू

Spread the love

 

मुंबई : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाबा सिद्धिकी यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आठवड्याभरात अजित पवार गटाच्या दुसऱ्या नेत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. दोन नेत्याच्या मृत्यूने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे भायखळा तालुकाअध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या झाली होती. सचिन यांच्या हत्येला आठवडा होत नाही, त्यातच माजी आमदार बाबा सिद्धिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला. वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबईतील वांद्र पूर्व परिसरात तीन ते चार जणांनी सिद्धिकी यांच्यावर शनिवारी रात्री ९.१५ च्या सुमारास गोळीबार केला. मुलाच्या कार्यालयाबाहेर असणाऱ्या बाबा सिद्धिकी यांच्या छातीला गोळ्या लागल्या. गोळीबारात जखमी झाल्यावर तातडीने सिद्धिकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपाचारादरम्यान बाबा सिद्धिकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत आठवड्याभरात दोन लोक प्रतिनिधींची हत्या झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गोळीबार करणारे दोघे अटकेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींपैकी दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. सध्या दोन्ही आरोपींना खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. पोलिसांकडून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा

Spread the love  मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून सरकारमधील दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *