Sunday , September 20 2026
Breaking News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणात बुडून तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

सिंधुदुर्ग : राज्यात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या जिल्ह्यात पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एकीकडे उन्हाळ्यापासून थोडासा दिलासा मिळवण्यासाठी तरुणाई पोहण्याचा आनंद घेत, विहिर, तलाव आणि जलाशयाकडे धाव घेतात. मात्र, काहीवेळा पोहण्याचा हा आनंद जीवावर बेतल्याचेही दु:खद प्रसंग घडले आहेत. आता, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडीतील करुळ धरणात तीन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली असून सुदैवाने दोघेजण बचावल्याची माहिती आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणात बुडून तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. बुधवार आज सायंकाळी ही घटना घडली. घटनास्थळी वैभववाडी पोलीस दाखल झाले असून मोठ्या संख्येने ग्रामस्थही एकटवले आहेत. येथील धरणावर अंघोळीसाठी म्हणून एकूण पाच जण गेले होते. त्यातील तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच करुळ येथील धरणावर नागरिकांनी मोठी गर्दी केली.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *