Sunday , September 20 2026
Breaking News

बाकनुर, बडस फाट्यावरील दिशादर्शक फलकाचे अनावरण

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बाकनूर आणि बडस या गावांच्या फाट्यावर भाजपा बेळगाव ग्रामीण माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी स्वखर्चाने उभारलेल्या कायमस्वरूपी दिशादर्शक नामफलकाचा अनावरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.

बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील बाकनुर गावची श्री महालक्ष्मी यात्रा संपत आली आहे. तथापि यात्राकाळात बाकनूर आणि बडस या गावांच्या फाट्यावर दिशा दर्शविणारा नामफलक नसल्यामुळे अनेक नातेवाईक आणि भाविकांमध्ये बाकनूरला जाण्यासाठी नेमके कोणत्या दिशेने जावे असा गोंधळ निर्माण होत होता. ही बाब स्थानिक कार्यकर्त्यांनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गावामध्ये गेलेल्या भाजपा बेळगाव ग्रामीण माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली. तेंव्हा दिशादर्शक नामफलकाची आवश्यकता ध्यानात घेऊन धनंजय जाधव यांनी बाकनुर व बडस येथे जाणारे मार्ग दर्शवण्यासाठी तात्काळ स्वखर्चाने या गावांच्या फाट्यावर कायमस्वरूपी दिशादर्शक नामफलक बसविला.

सदर दिशादर्शक नामफलकाचा अनावरण कार्यक्रम पूजाविधीसह फलकाला पुष्पहार घालून श्रीफळ वाढवण्याद्वारे नुकताच उत्साहात पार पडला. याप्रसंगी बोलताना गावातील नागरिक व कार्यकर्त्यांनी दिशादर्शक फलकाबद्दल समाधान व्यक्त करून धनंजय जाधव यांना धन्यवाद दिले. कार्यक्रमास के. डी. पाटील, संदीप गोडसे, के. एन. पाटील, नामदेव गोडसे, प्रल्हाद गुरव, संजय पाटील, गोपाल गावडे, निंगु गावडे, दीपक नाईक, संभाजी नाईक, चेतन पाटील, गोपाळ पाटील, बाळू चंदिलकर, प्रकाश सुतार, कल्लाप्पा कांबळे, अनिल पाटील, पराशराम पाटील आदींसह बडस -बाकनुर आणि बेळवट्टी गावातील भाजप कार्यकर्ते व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *