Sunday , September 20 2026
Breaking News

आर. पी. डी. महाविद्यालयाचा वार्षिक दिन उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थ्यानी ध्येयवेडे असावे, जिज्ञासू असावे, अभ्यासात सातत्य असावे, असे प्रतिपादन आय. ए. एस. अधिकारी श्री. किरण कामटे यांनी केले. राणी पार्वतीदेवी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, बेळगाव येथील 2025-26 सालच्या विद्यार्थी वार्षिक स्नेहसम्मेलन कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून ते बोलत होते.

आज जगात सगळीकडे, आपल्या सभोवती अनेक गोष्टी दररोज घडत असतात. त्यांचे आपण दररोज निरीक्षण करावे त्या गोष्टींबद्दल तुमच्या मनात कुतूहल निर्माण झाले पाहिजे, अनेक प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. प्रश्नांच्या उत्तरातूनच आपण खूप काही शिकतो. आपले ध्येय पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करत रहावे. मी माझ्सा आय. ए. एस. परीक्षेसाठी सहा वेळा प्रयत्न केला तेंव्हाच मला यश मिळाले, यशासाठी संघर्ष महत्वाचा असतो. यशाची कहाणी खूप कठीण असते, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे असते. प्रयत्नातून अपयश आले तर आपल्या आयुष्याकडूनच आपण भविष्यासाठी प्रेरणा घेवू शकतो म्हणून आपण सतत प्रयत्नशील राहावे. यश म्हणजे सतत आनंदी असणे. त्यासाठी आपल्या आयुष्यात आपण शिस्तबद्ध असावे, सामाजिक बांधीलकीची जाणीव असावी, समर्पण वृत्ती असावी, असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले तसेच त्यांनी महाविद्यालयातील स्वच्छता व निसर्ग सौंदर्याबद्दल प्रशंसा केली. तसेच विद्यार्थ्यानी विचारलेल्या स्पर्धा परीक्षेबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. के. ई. संस्थेचे सदस्य श्री. भारत शानभाग उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. अक्षय हिरेमठ यांच्या ईशस्तवनाने झाली. अतिथिचे स्वागत प्राचार्य डॉ. अभय पाटील यांनी केले. महाविद्यालयामधील उपक्रमांचा वार्षिक अहवाल स्टुडेंट कौन्सिल विभागाचे चेअरमन डॉ. एस. एच. पाटील यांनी सादर केला.

यावेळी वर्षभरात झालेल्या उपक्रम, कार्यक्रम, क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, परीक्षेमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी या सर्वांना अतिथीं व अध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. 2025-26 या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी असलेल्या कला शाखेतील कु. सक्षम जाधव उत्कृष्ट विद्यार्थी, कु. अनुष्का जाधव हिचा सर्वोत्कृष्ट प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. या वर्षातील बी. बी. ए. विभागातील सर्वोत्तम विद्यार्थीनी म्हणून कु. लक्षिता किशन जांगिड, वाणिज्य विभागाचे कु. चेतन आय. अड्डांगी आणि कु. विश्रांती की. नाईक आणि कला विभागाची विद्यार्थिनी स्वाती गजानन पाटील हिचा सर्वोत्तम विद्यार्थीनी म्हणून सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट

खेळाडू विद्यार्थी श्री. पुनीत कक्कनगी, उत्कृष्ट खेळाडू विद्यार्थिनी कु. संपदा कणबरकर यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

व्यासपीठावर शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. रामकृष्ण एन. आणि स्टुडेंट कौन्सिल विभागाचे चेअरमन डॉ. एस. एच. पाटील, जनरल सेक्रेटरी कु. सक्षम जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शर्मीला संभाजी आणि प्रा. श्रुती सालगुडे प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली यांनी केले. आभार डॉ. शरयू पोतनीस यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता प्रा. अक्षय हिरेमठ यांनी गाईलेल्या राष्ट्रगीताने झाली यावेळी पदवी व पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पुरस्कार प्राप्त विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *