Saturday , June 27 2026
Breaking News

भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये एसआयटी समोर नोंदवला जबाब

Spread the love

 

नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची नाशिक एसआयटीसमोर चौकशी सुरू झाली आहे. आज सकाळी चाकणकर यांनी पुण्याहून नाशिकला जात तपास यंत्रणेसमोर हजेरी लावली. रूपाली चाकणकर या वकिलांसोबत चौकशीसाठी पोहचल्या. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता असा आरोप आहे. त्याशिवाय खरात यांच्या शिवानिका संस्थाच्या विश्वस्तपदी रूपाली चाकणकर होत्या. त्यामुळे आर्थिक व्यवहारांबाबतही चाकणकर यांची चौकशी करण्यात येत आहे.

एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते या रूपाली चाकणकर यांची चौकशी करत आहेत. खरातशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत ही चौकशी होत आहे. या चौकशीला हजर होण्यापूर्वी चाकणकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, आज जो एसआयटीचा तपास सुरू आहे, त्यांना काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. ती देण्यासाठी मी आली आहे. तपासात माझे पूर्णपणे सहकार्य राहील. तपास यंत्रणेला जी काही मदत लागेल ती निश्चितपणे केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

२८ ते ३१ जानेवारी दरम्यान पुण्यात रंगणार शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Spread the love  पुणे : मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक ठरणारी घोषणा अखिल भारतीय मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *