
नवी दिल्ली : अखेर पाच दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर आज तमिळनाडूत शपथविधी पार पडला आहे. जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक, नेते, उपस्थित होते, विजय यांनी शपथ घेताना जमलेल्या जनतेने टाळ्या शिट्या वाजवून एकच उत्साह व्यक्त केला, तर विजय हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना त्यांचे आई-वडील भावूक झाल्याचे दिसून आले.
जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर विजय यांच्यानंतर आनंद यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. विजय यांच्यानंतर, टीव्हीकेचे आमदार थिरू एन. आनंद यांनी तामिळनाडूमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. ते विजय यांच्या जवळचे मानले जातात. त्यानंतर विजय यांचे निकटचे सहकारी आणि विल्लिवाक्कम मतदारसंघाचे आमदार अधव अर्जुन यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. ते बास्केटबॉल फेडरेशनचे अध्यक्षही आहेत. त्यांनी डीएमकेचे कार्तिक मोहन यांचा पराभव केला. टीव्हीकेचे महासचिव अरुण राज यांनी शपथ घेतली. ते तिरुचेंगोडे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असून, तो विजय यांच्या सरकारसाठी उपयुक्त ठरेल. सेंगोत्तैयन हे विजय यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. राज्यपालांनी त्यांना शपथ दिली. तामिळनाडू एआयएडीएमकेचे आठ वेळा आमदार राहिलेले सेंगोत्तैयन टीव्हीकेमध्ये सामील झाले आणि जिंकले. त्यांनी जयललिता यांच्या सरकारमध्येही मंत्री म्हणून काम केले होते. टीव्हीकेसाठी निवडणूक व्यवस्थापन सांभाळणारे आणि विजय यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जाणारे पी. वेंकटरामन यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. तिरुप्पनकुंद्रम मतदारसंघाचे आमदार आणि टीव्हीकेच्या सोशल मीडिया टीमचे उपाध्यक्ष आर. निर्मल कुमार यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जेन्झीमध्ये लोकप्रिय असलेले राजमोहन हे टीव्हीकेचे उपसचिव आहेत. त्यांनी मंत्री म्हणून शपथही घेतली आहे. डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. टी. के. प्रभू यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते विजय यांचे विश्वासू मानले जातात. विजय यांनी आपल्या टीममध्ये एका महिला आमदाराचाही समावेश केला आहे. शिवकाशी मतदारसंघाच्या आमदार एस. कीर्तना यांची मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
विजय यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले
तामिळनाडूच्या राजकारणात आज एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. तमिलगा वेत्री कषगम (TVK) प्रमुख विजय यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले आहे. विजय यांच्या मंत्रिमंडळात सध्या नऊ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. विजय यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून संपूर्ण स्टेडियममध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या शपथविधी सोहळ्याला देशातील अनेक मोठे नेते उपस्थित राहिले आहेत. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तेलंगणाच्या माजी राज्यपाल आणि भाजप नेत्या तमिळीसाई सुंदरराजन, भाजप नेते के. अन्नामलाई आणि तामिळनाडू भाजप अध्यक्ष नैनार नागेंद्रन हे देखील या कार्यक्रमाला पोहोचले आहेत. याशिवाय चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्याचा भाग बनले आहेत. विजय यांचे आई-वडीलही या खास प्रसंगी उपस्थित आहेत. तसेच अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या उपस्थितीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विजय यांच्या चित्रपट कारकिर्दीतील आणि राजकारणातील लोकप्रियतेचा प्रभाव या सोहळ्यात स्पष्टपणे दिसून आला.
Belgaum Varta Belgaum Varta