Saturday , August 29 2026
Breaking News

कर्नाटकचे नियोजन आणि सांख्यिकी मंत्री डी. सुधाकर यांचे निधन

Spread the love

 

बेंगळूर : हिरियूर मतदारसंघाचे आमदार आणि कर्नाटक राज्याचे नियोजन आणि सांख्यिकी मंत्री डी. सुधाकर यांचे आज रविवार दिनांक 10 मे रोजी पहाटे निधन झाले. निधनसमयी ते 66 वर्षांचे होते.

फुफ्फुसाच्या संसर्गामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते दोन आठवड्यांहून अधिक काळ लाइफ सपोर्ट सिस्टमवर होते. बेंगळूर येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये आज पहाटे सव्वा तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

डी. सुधाकर हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते आणि चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर मतदारसंघातून आमदार झाले होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, संपूर्ण राज्य तसेच पक्षासाठी हे एक मोठे नुकसान असल्याचे म्हटले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राज्यातील १०१ तालुके दुष्काळग्रस्त घोषित; बेळगाव जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही

Spread the love  ८९ तालुक्यांत तीव्र दुष्काळ बंगळूर : राज्यातील १०१ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *