Saturday , August 29 2026
Breaking News

बेळगाव शहरातील विविध भागात आज वीजपुरवठा खंडित

Spread the love

 

बेळगाव : शहरातील 110 केव्ही वडगाव वीज वितरण केंद्रातून जाणाऱ्या फीडरच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी रविवार 10 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खालील भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती हेस्कॉमकडून देण्यात आली आहे.
या वीजबंदमुळे शहरातील अनेक भागांमध्ये दिवसभर वीजपुरवठा बंद राहणार असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वीजपुरवठा खंडित होणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत :
बाजार गल्ली, राणी चन्नम्मा नगर, पहिला व दुसरा क्रॉस, सुभाषचंद्र नगर, उत्सव हॉटेल परिसर, तिसरा रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, वडगाव, विष्णू गल्ली, धामणे रोड, देवांग नगर (पहिला व दुसरा क्रॉस), वझे गल्ली, रयत गल्ली, मलप्रभा नगर, कल्याण नगर, तेग्गीन गल्ली, वड्डर छावणी, ढोर गल्ली, जुने बेळगाव, गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुका नगर, बस्ती गल्ली, होसूर, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थ नगर, ओम नगर, पाटील गल्ली, हिंदवाडी, सुभाष मार्केट, आर. के. मार्ग, हिंदवाडी कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स, अथर्व टॉवर, आरपीडी रोड, भाग्यनगर दहावा क्रॉस, रानडे कॉलनी (पहिला व दुसरा क्रॉस), सर्वोदय मार्ग रोड, महावीर गार्डन परिसर, आनंदवाडी, विद्यानगर (अनगोळ), वडगाव मुख्य रस्ता, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साई श्रद्धा कॉलनी, अनगोळ मधील काही भाग, केशव नगर तसेच येळ्ळूर रोड परिसर.
नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन हेस्कॉमने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामचा उद्घाटन व शपथविधी सोहळा शनिवारी

Spread the love  बेळगाव : सामाजिक सेवा, मैत्री आणि जागतिक एकात्मतेचा संदेश घेऊन कार्यरत असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *