Tuesday , May 12 2026
Breaking News

अखिल भारतीय राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेला प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशन आणि कर्नाटक स्टेट ब्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथे शनिवार रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय स्तरावरील ब्रिज स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत देशभरातील १०० स्पर्धक सहभागी दर्शवला आहे. तिसऱ्या रेल्वे ब्रिज जवळ असलेल्या नेटिव्ह हॉटेलच्या सभागृहात आज शनिवारी व उद्या रविवार रोजी ही स्पर्धा होणार आहे. शनिवारी सकाळी या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला बेळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष एस. वाय. प्रभू , आनंद गाडगीळ, एम. आय. हेगडे, नितीन लोकुर, सिद्धार्थ चंदगडकर आणि सुब्रमण्यम व्यासपीठावर उपस्थित होते.

अध्यक्ष एस. वाय. प्रभू म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील ब्रिज स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा बंगळूर व अन्य राज्यातील शंभरहून अधिक ब्रिज स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना एक लाख रुपयांची रोख पारितोषिके, स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.

ब्रिज हा जगातील १०० हून अधिक देशांमध्ये खेळला जाणारा एक लोकप्रिय पत्त्यांचा खेळ आहे. इतर अनेक पत्त्यांच्या खेळांप्रमाणे हा केवळ नशिबावर आधारित नसून, तो खऱ्या अर्थाने बहुप्रकारच्या कौशल्यांची कसोटी पाहणारा खेळ आहे. म्हणूनच ब्रिजला जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये, ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा चौकटीतही मान्यता मिळालेली आहे.

 

हा खेळ स्मरणशक्ती वाढवतो, जोडीदारांमधील परस्पर समज अधिक दृढ करतो आणि संघभावना निर्माण करतो. तसेच नवकल्पना, कल्पनाशक्ती, संभाव्यतेचे विश्लेषण आणि अचूक अंमलबजावणी यांसारखी कौशल्ये विकसित करण्यास मदत करतो. ब्रिजमध्ये जिंकणे-हरणे हे दुय्यम असते; खरी मजा आणि महत्त्व मानसिक व्यायामात असते.

ब्रिज नियमित खेळणे मेंदूसाठी उत्तम व्यायाम आहे. तो मानसिक ताजेपणा वाढवतो आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये होणारी स्मर-णशक्तीची घसरण व मानसिक थकवा कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत करतो, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी असोसिएशनचे सदस्य नंदकुमार देशपांडे, संतोष ममदापुरे, आर. एल. बर्वे आदी मान्यवरही उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठी भाषा प्रेरणा मंचच्यावतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील मराठी भाषा प्रेरणा मंचच्यावतीने नुकताच निकाल जाहिर झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *