बेळगाव : “एखादी बँक 118 वर्षे वाटचाल करते म्हणजेच ती आपल्या ग्राहकांच्या पैशांची किती काळजी घेते ते दिसून येते. पायोनियर अर्बन बँकेच्या आजवरच्या सर्वच चेअरमन आणि संचालकांनी जनतेच्या पैशाची काळजी घेतली आहे. बँकेतील पैसा इतरत्र ठिकाणी वापरलेला नाही आणि म्हणूनच या बँकेने चांगली प्रगती केली आहे. याही पुढे ही बँक अशीच प्रगतीपथावर राहील असा मला विश्वास वाटतो” असे विचार बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू शेठ यांनी बोलताना व्यक्त केले. पायोनियर अर्बन बँकेच्या सहाव्या शाखेचे उद्घाटन रविवारी कणबर्गी इथे करण्यात आले. श्री. शेठ यांच्या हस्ते फीत सोडून शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर हे होते.
दीप प्रज्वलन करून बँकेचे माजी चेअरमन अविनाश पोतदार यावेळी बोलताना म्हणाले की, “विश्वास, जिद्द, एकी ठेवून कार्य केले तर काय होऊ शकते त्याचे उदाहरण म्हणजे पायोनियर बँकेची झालेली प्रगती. बेळगाव शहरांमध्ये पायोनियर बँकेची इमारत ही एक आयकॉनिक इमारत आहे. 1905 साली ज्या वास्तु तज्ञांनी आणि ज्या संचालकांनी ही बँक उभा केली त्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले पाहिजे. बदलत्या काळानुसार निर्णय घेण्याची गरज असते. ते निर्णय या बँकेचे चेअरमन घेत असल्यामुळे ह्या बँकेची प्रगती झालेली आहे. याही पुढे समाजासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करा. माझे आजोबा भीमराव पोतदार हे 49 वर्षे सलग या बँकेचे चेअरमन होते त्यानंतर अधिकाधिक वर्षे चेअरमन असणारे प्रदीप अष्टेकर हे एकमेव आहेत”. असे ते म्हणाले
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, “सबका साथ, सबका विश्वास आणि सबका सहकार ही त्रिसूत्री डोळ्यासमोर ठेवून पायोनियर बँकेने जी वाटचाल केली आहे ती कौतुकास्पद आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे ते काम पायोनियर बँकही करीत आहे ही अतिशय गौरवाची गोष्ट आहे. ही शाखा या भागातील नागरिकांच्या विकासाचे केंद्रबिंदू ठरेल असा मला विश्वास वाटतो” असे ते म्हणाले.
स्ट्रॉंग रूमचे उद्घाटक माजी महापौर यल्लाप्पा कुरबर यांनी शुभेच्छा देताना या परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी आपली खाती या बँकेत काढावीत पायोनियर बँकेला प्रोत्साहन द्यावे आणि स्वतःचाही विकास करून घ्यावा.” असे आवाहन केले
सेफ डिपॉझिट लॉकर्स चे उद्घाटन केलेले एपीएमसीचे माजी व्हा. चेअरमन नागेश गड्डे म्हणाले की,” लोकांच्या विश्वासामुळे ही बँक मोठी झाली आहे. यानंतर या बँकेच्या अनेक शाखा होतील आणि जनतेच्या विकासाच्या त्या केंद्रबिंदू ठरतील असे मला वाटते”
संगणकाचे उद्घाटन केलेल्या कलखांबच्या गणेश सोसायटीचे संस्थापक मनोहर हुक्केरीकर म्हणाले की, एक विश्वासू बँक म्हणून पायोनियर बँकेचा गौरव आहे. ज्या पोतदार यांनी पायोनियर बँक, मार्कंडेय साखर कारखाना, एपीएमसी उभा केली त्यांनी या बँकेच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. विद्यमान चेअरमन आणि संचालकांनी एकजुटीने केलेल्या कार्यामुळे ही बँक प्रगती करीत आहे. या बँकेच्या अधिकाधिक शाखा निघाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो” असे ते म्हणाले .
नगरसेवक रवी साळुंखे यांच्या हस्ते ट्रेजरीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात बँकेला शुभेच्छा देत या बँकेच्या अनेकानेक शाखा निघाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात अनंत लाड यांच्या प्रास्ताविकाने झाली. संस्थेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून बँकेने गेल्या पाच वर्षात केलेल्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. त्यांच्या हस्ते आणि बँकेच्या इतर संचालकांच्या हस्ते पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.
पाहुण्यांचा परिचय अनंत लाड यांनी करून दिला. कणबर्गी च्या नगरसेविका सौ अस्मिता पाटील यांच्या हस्ते श्री लक्ष्मी सरस्वती फोटोचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास निमंत्रित म्हणून उपस्थित असलेल्या अर्जुन मुचंडीकर, नारायण नाईक, अशोक शिरोळे, दानेश बाळेकुंद्री, बाहुबली वीरगौडर, संजय इनामदार, महेश हिरेमठ, जयवंत पाटील, दीपक कंग्राळकर, बाळाराम मोटरे, शिवाजी पाटील, डॉ. सिद्धू वडेयार, भावकान्ना हिरोजी, बसवानी भंडारगाली, पुंडलिक मलाई यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन संचालकांचे हस्ते गौरव करण्यात आला.
जागा मालक सुंदर करविनकोप, ठेवी ठेवणारे संजय गुंडपन्नावर, सुनील चौगुले वगैरेनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत लाड यांनी केले तर व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी बँकेचे संचालक सर्वश्री शिवराज पाटील, गजानन पाटील, यल्लाप्पा बेळगावकर, सुहास तराळ, रवी दोड्डनावर, मारुती सिग्गीहळळी, गजानन ठोकणेकर, विद्याधर कुरणे, बसवराज इटी, नितीन हिरेमठ, ज्ञानेश्वर सायनेकर, कमलेश मायानाचे, सुवर्णा शहापूरकर आणि सी ई ओ अनिता मुल्या यांच्यासह कर्मचारी वर्ग व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.