बेळगाव : राज्यात सर्वत्र काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असून पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास विधी व संसदीय कार्यमंत्री एच. के. पाटील यांनी व्यक्त केला.
ते आज बेळगावात माध्यमांशी बोलत होते. केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली शिग्गावी पोटनिवडणुकीचा प्रचार करण्यात आला असून, काँग्रेसचा विजय निश्चित आहे. भाजप वक्फसह अनेक खोट्या कल्पनांना चालना देण्याचे काम करत आहे. मात्र त्यांच्या खोट्या प्रचाराला कोणीही बळी पडणार नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला लोक पाठिंबा देतील आणि पोटनिवडणुकीत तिन्ही मतदारसंघात काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असून याचे उत्तर पंतप्रधान मोदींना द्यावे लागेल. पोटनिवडणुकीत बदनामीसाठी जेपीसी समितीचा वापर करण्याचे कारण काय? निवडणुकीदरम्यान तपास यंत्रणांचा गैरवापर अनधिकृत आहे. कर्नाटक हे न्याय आणि कायद्याचे राज्य आहे. कर्नाटकात वक्फ कायदा नाही का? केंद्राकडून तपास यंत्रणा पाठवण्याची काय गरज? निवडणुकीच्या वेळी जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे. हा राजकीय गैरव्यवहार असल्याचे ते म्हणाले.अपप्रचार करून भाजपाला पोटनिवडणूक जिंकता येणे शक्य आहे असे वाटत असल्यास हे अत्यंत चुकीचे आहे. अपप्रचारामुळे भाजपाला पराभवच पत्करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री एच. के. पाटील यांनी व्यक्त केली.