बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागाच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून वारंवार मागणी करून देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रामुख्याने बेळगाव -बाची, बडस-बाकनूर, मच्छे-वाघावडे, मुतगा-सांबरा या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात माजी महापौर शिवाजी सुंठकर, मार्कंडेय साखर कारखान्याचे चेअरमन आर. आय. पाटील, सुनील अष्टेकर, पुंडलिक पावशे, लक्ष्मण लाळगे, बेळगाव राष्ट्रवादीचे महंतेश कोळूचे, किसन सुंठकर आदींनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता सुब्बाराव आणि सहाय्यक अभियंता कोलेकर यांची भेट घेऊन चर्चा केली आणि ग्रामीण भागातील सर्व रस्ते तात्काळ दुरुस्ती करण्याची विनंती केली.