Thursday , December 12 2024
Breaking News

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची होणार नियुक्ती; नवनिर्वाचित आमदारांना देणार शपथ

Spread the love

 

 

मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आज हंगामी अध्यक्ष म्हणून राजभावनात जाऊन शपथ घेणार आहे. विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. आज या हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाईल. 7, 8 आणि 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान हे हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

तीन दिवसीय विधिमंडळाचं विशेष अधिवेशन

येत्या 7 डिसेंबरला तीन दिवसीय विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सचिवालयाकडून सर्व कर्मचाऱ्यांना तयारीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्ष निवड होईल.

About Belgaum Varta

Check Also

मराठी भाषिकांना तुरुंगात डांबणाऱ्या कर्नाटक सरकारचा धिक्कार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Spread the love  मुंबई : “बेळगावमध्ये मराठी भाषिकांबद्दल आणि कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न जो आहे? याबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *