खानापूर : बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी मराठी भाषिकांच्या वतीने समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही उद्या सोमवार दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सीमाभागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बेळगाव येथील महामेळाव्याला उपस्थित राहावे यासाठी खानापूर तालुका समितीच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. रविवार दि. 8 रोजी आठवडी बाजाराच्या निमित्ताने खानापूर शहरात महामेळाव्याच्या जनजागृतीबाबतची पत्रके वाटून महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीचे नेते व पदाधिकाऱ्यांनी केले.
जनजागृतीवेळी खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, खजिनदार संजीव पाटील, उपाध्यक्ष जांबोटी विभाग जयराम देसाई, माजी सभापती मारुती परमेकर, पुंडलिक पाटील, जगन्नाथ देसाई (कापोली), भीमसेन करंबळकर, नाना घाडी, रवींद्र शिंदे, मारुती गुरव, ब्रह्मानंद पाटील आदी उपस्थित होते.