बेळगाव : आजपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने धर्मवीर संभाजी चौकात सकाळी अकरा वाजता महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सकाळ पासूनच धर्मवीर संभाजी चौक येथे पोलीस आयुक्त मोठ्या या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने फौज फाट्यासह चोख बंदोबस्त ठेवला असून पोलीस आयुक्त स्वतः उपस्थित आहेत.
समितीच्या महामेळाव्याचा धसका पोलीस खात्याने घेतला असून शहरात पाच ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. शहरात देखील अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांच्यासह शिवसेना नेत्यांना बेळगाव जिल्हयात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे.