बेळगाव : विविद्दोदेश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ नंदीहळी ता. जि. बेळगाव या कृषी पत्तीन सहकारी संघाची निवडणूक नुकताच पार पडली. या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी श्री. परशराम श. कोलकर यांची चौथ्यांदा संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली व सौ. पद्मजा चं. पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड केली. या संदर्भात निवडून आलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचा सत्कार माजी जिल्हा पंचायत स्थायी समिती अध्यक्ष व येळ्ळूर जिल्हा पंचायत सदश्य श्री. रमेश परशराम गोरल यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना श्री. रमेश गोरल यांनी या संघाच्या उन्नतीसाठी सर्व संचालक मंडळाने केलेल्या कार्याची प्रशंसा केली व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, तेव्हा कार्यक्रसाठी गावातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच संघाचे अध्यक्ष श्री. परशराम श. कोलकार, उपाध्यक्ष सौ. पद्मजा चं. पाटील , सदस्य – शिवनगौडा पाटील, राजेंद्र पाटील, भाऊ पाटील, सुरेश जाधव, कल्लाप्पा बेळगावकर, यल्लाप्पा हागीदार, नामदेव यळगूकर, चेतन पाटील, प्रभावती बेळगावकर व लक्ष्मण जाधव उपस्थित होते, तर आभार प्रदर्शन श्री एस. वाय. गावकर यांनी केले.