खानापूर : सीमा लढ्यात नेहमीच अग्रभागी असलेल्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी देखील आपला मराठी बाणा दाखवून दिला. महामेळाव्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत खानापूर तालुक्यातील नेते व कार्यकर्ते महामेळाव्यात सामील होण्यासाठी बेळगावकडे येताना दिसत होते. खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी पोलिसांना चकवा देत धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. बेळगाव शहराबरोबरच खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, गोपाळराव पाटील, संजीव पाटील, पांडुरंग सावंत, रणजीत पाटील, राजाराम देसाई, दत्तू कुट्रे, प्रकाश चव्हाण, शंकर मामा पाटील, धनंजय पाटील, अजित पाटील, कृष्णा कुंभार, मारुती परमेकर, जयराम देसाई, सूर्याजी देसाई, अण्णा बाळा पाटील, मुकुंद पाटील, रमेश धबाले, संदेश कोडचवाडकर, सुधीर नावलकर, नागेश भोसले, रवींद्र शिंदे, रवी देसाई, रवळू वड्डेबलकर, बाळकृष्ण पाटील, पुंडलिक पाटील, गणेश पठाण, विठ्ठल देसाई, प्रभाकर विजय, संतोष चिकलकर, बाळकृष्ण देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव महामेळाव्याला हजर असलेल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांना एपीएमसी पोलिसांनी अटक करून त्यानंतर मारीहाळ पोलीस स्टेशन येथे येऊन गेले. संध्याकाळी उशिरा सर्वांची सुटका केली.