बेळगाव : सतीश जारकीहोळी फाउंडेशन यांच्यावतीने 11 व्या सतीश क्लासिक 2024 राज्य आणि जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 16 डिसेंबर रोजी आरडी हायस्कूल ग्राउंड चिकोडी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून राज्य आणि जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेसाठी अनेक हौशी बॉडी बिल्डिंग बिल्डर्सना आतुरता लागून राहिलेली असते.
राज्यातील अडीचशेहून अधिक बॉडी बिल्डर्स आणि 300 + ऑफिशियल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मोठ्या रोख रकमेची बक्षिसे देखील आयोजन करण्यात आली आहेत.
दरम्यान बेळगाव ग्रामीण, तालुका, जिल्हा तसेच राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बॉडी बिल्डर्सला सतीश क्लासिक स्पर्धेत भाग घेण्यास कोणत्याही प्रकारचे निर्बंध असणार नाही. सतीश क्लासिक स्पर्धा सर्वांसाठी खुली असेल असेही आयोजकांनी कळविले आहे. यासाठी हौशी बॉडी बिल्डर्सनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रियाज चौगुला 9481457576 आणि अजित सिध्दनावर 9844063043 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.