खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील हेमाडगा या ठिकाणी तेरेगाळी गावातील शेतकरी भीमाप्पा मल्लाप्पा हणबर यांच्या चार वर्षाच्या म्हशीवर वाघाने हल्ला केल्याने म्हशीचा मृत्यू झाल्याने सदर गरीब शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
म्हशीचा मालक, म्हशीला वाघाने खाल्ल्याचे सांगत आहे. परंतु म्हैस वाघाने खाल्ली की, एखाद्या दुसऱ्या जंगली प्राण्याने खाल्ली याबाबत निश्चित माहिती समजू शकली नाही. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. याबाबत संबंधित वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर करावीत व शेतकऱ्यांना व त्यांच्या पाळीव जनावरांना संरक्षण मिळवून देण्याची मागणी, या भागातील ग्रामस्थ व शेतकरी करीत आहेत.