बेळगाव : कर्नाटकातील पहिली महिला सहकारी बँक म्हणून सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जिजामाता महिला सहकारी बँकेची २०२५-३० या कालावधीसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली. नव्याने चार संचालकांचा समावेश करण्यात आला. बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार इच्छुकांनी अर्ज दाखल केले. परंतु अर्ज माघारी दिवशी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. संचालक मंडळात नव्याने ऍड. मीनल जयराज मोदगेकर, संगीता संजय काविलकर, स्वाती गणेश चौगुले, उमा शामराव कांबळे यांचा समावेश करण्यात आला आहे.
तर मागील संचालक मंडळातील भाविकाराणी जीवनराज होनगेकर, साक्षी स्वप्निल चोळेकर, शशिकला गणपतराव काकतकर, लता नारायण खांडेकर, मंगल पांडुरंग नाईक, लिला गोविंद पाटील, भारती संजीव किल्लेकर यांची पुन्हा निवड झाली आहे.
बँकेच्या हितासाठी संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे गोविंदगौडा पाटील, बँकेचे व्यवस्थापक ऍड. नितीन आनंदाचे यांनी काम पाहिले.