जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी : ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन
निपाणी (वार्ता) : नांदणी येथील वृषभाचल पर्वतावर श्रीमद्देवाधिदेव १००८ भगवान आदिनाथ तीर्थकर यांची ३१ फुट उंच नयनमनोहर ब्रह्ममूर्ती प्रतिष्ठापणा होवून त्रिद्वादश वर्षे पूर्ण होत आहेत. या दरम्यान २४ तीर्थंकर प्रतिष्ठापणा, २४ तीर्थंकर (टोक) चरण पादुका दर्शन, चतुर्मुख जिनबिम्ब व समवसरण मंदिर उभारण्यात आले आहे. या त्रिद्वादश पूर्तीच्या अनुशंगाने श्री १००८ आदिनाथ तीर्थंकर ब्रह्ममूर्तीच्या उजव्या बाजूस अतिशय सुंदर मनमोहक अरिष्टनिवारक श्री १००८ मुनिसुव्रतनाथ तीर्थंकरांची ३१ फुट उंच पद्मासन मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. तसेच डाव्या बाजूस दाक्षिणात्य शिल्पकलेतील पांढऱ्या पाषाणातील नूतन जिनमंदिर (प्रथम शासनदेवी, चक्रेश्वरी मंदिर) उभारले असून यामध्ये मूलनायक श्री १००८ भ. आदिनाथ तीर्थंकरांची मूर्ती प्राण प्रतिष्ठापित होणार आहे. यासोबतच क्षेत्रावर विशेष दर्शन, क्षेत्रपाल मंदिर, मठ मंदिराजवळ सिध्दांत दर्शन मंदिर व नांदणी धर्मनगरीतील अतिप्राचीन भगवान १००८ पार्श्वनाथ तीर्थंकर मंदिराच्या प्रांगणामध्ये मानस्तंभोपरी चतुर्मुख जिनबिंब प्राण प्रतिष्ठापित होणार आहे. या नूतन मंदिर व मूलनायक तीर्थंकरांचे पंचकल्याण प्रतिष्ठा व त्रिद्वादश पूर्तीच्या निमित्त श्रीमद्देवाधिदेव १००८ भगवान आदिनाथ तीर्थंकर ३१ फुट उंच नयनमनोहर न्मूर्तीचा महामस्तकाभिषेक महोत्सव होणार आहे. जीनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी यांनी दिली. बोरगाव येथे शनिवारी (ता.२१) आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकार रत्न उत्तम पाटील, वीर सेवा दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटीलयांची प्रमुख उपस्थिती होती.
जिनसेन भट्टारक स्वामी म्हणाले, पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव गणाचार्य १०८ परम शिष्य विरागसागरजी महाराज राष्ट्रसंत चर्याशिरोमणी, दिगंबराचार्य १०८ विशुद्धसागर महाराज संघ आणि आचार्यश्री १०८ धर्मसेन महाराज संघ, आचार्यश्री १०८ वर्धमानसागरजी महाराज संघ,श आचार्यश्री १०८ चंद्रप्रभासागर महाराज संघ, आचार्यश्री १०८ जिनसेन महाराज संघ, आचार्यश्री १०८ मयंकासिगर महाराज संघ, आचार्यश्री १०८ शांतिसेन महाराज संघ, आचार्यश्री १०८ धर्मभूषण महाराज संघ, आचार्यश्री १०८ सुयशगुप्ती महाराज संघाच्या उपस्थितीत १०० पेक्षा अधिक ऋषी-मुनी आणि भारतातील सर्व भट्टरक उपस्थित राहणार आहेत.
स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी पंचकल्याणका प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव, जगद्गुरू, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यावेळी कर्नाटकासह महाराष्ट्रातील श्रावक सहाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामींनी केले आहे. बैठकीस वीर सेवा दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सागर शंभूशेटे, आप्पासाहेब भागाजे, संजय बोरगांवे, राजू करडे, चंद्रकांत धुळासावंत, जिनेश्वर जुगळे, राजू नरके, इंद्रजीत पाटील मनोजकुमार पाटील, अभयकुमार मगदूम, अरिहंत बँकेचे सीईओ अशोक बंकापुरे, आर. बी. पाटील, राजू मगदूम, पी. के. पाटील यांच्यासह जैन समाज बांधव उपस्थित होते.