Monday , December 23 2024
Breaking News

तब्बल ३१ वर्षांनी भरली पुन्हा शाळा; १९९३ मधील वर्ग मित्र आले एकत्र

Spread the love

 

काडसिद्धेश्वर हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील काडसिद्धेश्वर हायस्कूल मराठी माध्यमाच्या शाळेतील १९९२-९३ सालातील १०च्या वर्गमित्रांची तब्बल ३१ वर्षानी शाळा भरली. यावेळी गुरुजनांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वर्गाला त्यावेळी शिकवणारे १२ गुरुजन व ७० विद्यार्थी उपस्थित होते.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. एस. जोडट्टी होते.
रमेश पाटील यांनी स्वागत तर अभिजीत जिरगे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावरील मान्यवर व गुरुजनांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. निवृत्ती शिक्षकांनी मनोगतातून माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निवृत्त शिक्षक बी. एन. इंगळे, जे. आर. जनवाडे, बी. एस. मालगार, आर. जे. सोलापुरे, एम. ए. जमदाडे, डी. एस. किल्लेदार, एम. एम. पाटील, एस. एस. संकपाळ, ए. बी. बसर्गे या गुरूजनांची माजी विद्यार्थीनींकडून पाद्यपूजा करण्यात आली.
माजी विद्यार्थीनी शालेय जीवनातील आठवणी, गंमती,जमती, गोड क्षण सर्वा समोर मांडले. त्यानंतर वर्ग भरवून शिक्षकांनी पुन्हा एकदा ज्ञानदान केले.
यावेळी अंताक्षरी, संगीत खुर्ची, गायन, कवन, असे वेग-वेगळे खेळ स्पर्धा घेऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली. अपर्णा चौगुले यांनी आभार मानले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी रमेश खोत, राजेंद्र हळीज्वोळे, किरण बम्मणगे, सातगोंडा बागेवाडी, विश्वास लठ्ठे, नामदेव हरेर, भरमा जाधव शश्मिता तावदारे ललिता मगदूम यांनी परिश्रम घेतले. यावेळी निवृत्त शिक्षकासह माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावे आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करावी : प. पू. सच्चिदानंद बाबा

Spread the love  निपाणी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात बंगलादेश विरोधात आंदोलन आणि निषेध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *