बेळगाव : अनगोळ वड्डर गल्लीत ड्रेनेजची पाईप फुटून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी पसरले आहे.
दुर्गंधीयुक्त पाणी साचल्यामुळे तेथील नागरिकांची खूप गैरसोय होत आहे आणि दुर्गंधी व वास खूपच धोकादायक आहे व यामुळे वड्डर गल्ली अनगोळ येथील परिसरातील नागरिकांना साथीचे असलेले आजार होऊ शकतात. ही ड्रेनेज पाईप गल्लीत असल्यामुळे सांडपाणी वाहून तळे साचले आहे. वाहतुकीस अडथळा व आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. त्याकडे महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाईपची दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक अवर्सेकर यांनी केली आहे.
