विकासकामाचा घेतला आढावा; आमदार लक्ष्मी हेब्बाळकर
बेळगाव : बी. के. कंग्राळी गावातील तलावाच्या विकासासाठी आमदार निधीतून 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हा निधी मंजूर केला असून तलावाच्या विकासाचे काम प्रगती पथावर आहे. तलावाच्या विकासकामाचा आढावा घेण्यासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र आणि युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली गावकर्यांनी तलावाची पाहणी केली. यावेळी मृणाल हेब्बाळकर यांनी सुरु असलेल्या कामाबाबत संबंधित विभागाला काही सूचना दिल्या.
बेळगाव ग्रामीणमध्ये विकासाची कामे निकृष्ट दर्जाची नको तर दर्जेदार काम करा. राज्य सरकारकडून मंजूर झालेल्या निधीचा योग्यरित्या वापर करावा. कामाच्या दर्जाबाबत कोणत्याही तक्रारी येऊ नयेत, अशा सक्त सूचना ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी मृणाल हेब्बाळकर यांच्यासमवेत जयराम पाटील, उमेश पाटील, नारायण पाटील, तानाजी पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
