Saturday , January 18 2025
Breaking News

चंदगड तालुका काँग्रेस कमिटीकडून केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन…

Spread the love

चंदगड :(ज्ञानेश्वर पाटील) : ओबीसी आरक्षण रद्द व देशभरातील अघोषित आणीबाणी या दोन्ही विषयाविरोधात आज चंदगड तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण व शहरकडून तहसीलदार कार्यालय येथे केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी तथा सामाजिक न्याय दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या देशभरातील अघोषित आणीबाणी विरोधात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द होण्याला जबाबदार तत्कालीन केंद्र सरकार आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. ती त्यांनी दिली नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले. याला सर्वस्वी तत्कालीन फडणवीस सरकार व मोदी सरकारच जबाबदार आहेत. याकरिता निषेध करण्यासाठी चंदगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस पक्षाचे राज्य व्यापी आंदोलन सर्वत्र होत आहे, त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार व जिल्हा अध्यक्ष व पालकमंत्री बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड तेथे आज आंदोलन शांततेत व कोविडचे सर्व नियम पाळत पार पाडण्यात आले.

यावेळी नगरसेवक बाळासाहेब हळदणकर, कलीम मदार, अभिजित गुरवबे, जयसिंग पाटील, जयवंत शिंदे, वसंत पाटील, प्रदीप पाटील, अशोक दाणी, सुधाकर बांदविडेकर, मेहताब नाईक, प्रसाद वाडकर, गोमटेश वणकुण्द्रे, अमोल कुंभार, रुषिकेश जाधव, सुधीर पिळणकर, जितेंद्र पाटीलसह आदी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व होते.

About Belgaum Varta

Check Also

गडहिंग्लज व नेसरी अंनिसतर्फे सर सेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक परिसराची स्वच्छता!

Spread the love  गडहिंग्लज (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर हे महापराक्रमी व प्रतापी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *