बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभिकरण समितीची बैठक शुक्रवारी (25 जून) चवाट गल्ली येथे संपन्न झाली. बैठकी वेळी सुशोभीकरण समितीचे सरचिटणीस प्रसाद मोरे यांनी मागील वर्षाचा सुशोभीकरणाचा आढावा घेतला. उपाध्यक्ष श्रीनाथ पवार यांनी अनुमती दिली. यानंतर सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी सुशोभीकरण माहिती देतेवेळी गेल्या वर्षी 6 जून रोजी बेळगाव शहराचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते भूमिपूजन करून सुशोभीकरणास सुरूवात करण्यात आली होती. पण काही काळाने शासकीय व तांत्रिक कारणामुळे व कोरोना महामारीमुळे सुशोभीकरणाचे काम थांबले होते.
तरी आजपर्यंत पाठपुरावा करून टेंडर महानगरपालिकेच्या कक्षात निधी उपलब्ध नसल्यामुळे कार्य गेल्या चार महिन्यापासून थांबले आहे, त्यासाठी सुशोभीकरण समितीने आमदार अनिल बेनके यांची भेट घेऊन सुशोभिकरणाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली. आमदारांनी मागणीची दखल घेऊन येत्या सोमवारपासून कामास सुरूवात होईल असे आश्वासन आमदारांनी दिले. यावेळी अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस प्रसाद मोरे, उपाध्यक्ष श्रीनाथ पवार, आकाश धुराजी, परशराम झेंडे, चंद्रकांत माळी, धनंजय मोरे राजन जाधव उपस्थित होते.
Check Also
प्रा. डॉ. प्रवीण ए. घोरपडे यांचा सत्कार
Spread the love बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर इंडिया बेळगाव शाखेच्या वतीने ५७ वा अभियंता …