Sunday , July 13 2025
Breaking News

बोरगांव भटक्या कुटुंबीयांना ‘अरिहंत’चा आधार

Spread the love

20 पेक्षा अधिक कुटुंबांना आहार धान्य किट  : सामाजिक बांधिलकीतून उपक्रम

निपाणी : लाॅकडाउनमुळे गेल्या वर्षभरापासून घरात बसून राहिलेल्या बोरगांव शहरातील सुमारे वीसहून अधिक भटकी जाती-जमाती कुटुंबांना अरिहंत उद्योग समूहाने जीवनावश्यक वस्तूचे कीट वितरण करून त्यांना आधार दिला आहे. माणुसकीच्या दृष्टिकोनातून अरिहंतने जोपासलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बोरगांव शहरामध्ये सुमारे वीसहून अधिक कुटुंबे भटकी जाती जमाती आहेत. सुगीच्या काळात बहुरूपी कला, पावसाळ्यात किरकोळ व्यवसाय करणे, शाळा प्रारंभ नंतर शाळेमध्ये जाऊन पुस्तक विकणे, सार्वजनिक ठिकाणी विविध कला सादर करणे बरोबरच अनेक कामे करून आपला उदरनिर्वाह चालवित आहेत. पण गेल्या वर्षभरापासून लाकडाऊन झाल्यामुळे हे कुटुंब घरीच थांबून आहेत. खायला अन्न नसल्याने कुटुंब चालवणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासत सहकार नेते रावसाहेब पाटील, उद्योगपती अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांनी अरिहंत उद्योग समुहामार्फत एक महिना पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. युवा नेते अनुराग पाटील यांच्या उपस्थितीत येथील भटक्या जाती जमाती मधील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूची किट वितरण करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष संगप्‍पा ऐदमाळे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, माणिक कुंभार, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय वास्कर, रमेश वास्कर, प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापुरे, संतोष वठारे, अनुसाया कोंढुर, जयश्री संकनवर, लक्ष्मी संकनवर, कमलावा बहुरूपी, कावेरी कुंडूर, गौरम्मा बहुरूपी, सुवर्णा संकनवर यांच्यासह अरिहंत उद्योग समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

Spread the love  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका, युवा समिती निपाणी तालुका यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *