Wednesday , May 29 2024
Breaking News

अथणीत पोलिसांची धडक कारवाई; दहा अट्टल दरोडेखोरांना केलं जेरबंद

Spread the love

अथणी (बेळगाव) : अथणी, कागवाड, रायबाग, हारुगेरी व जमखंडी तालुक्यात विविध ठिकाणी दरोडा टाकलेल्या दहा अट्टल दरोडेखोरांच्या टोळीस अथणी पोलिसांनी शुक्रवारी (ता. 11) जेरबंद केले. त्यांच्याकडून 4.70 लाखाचा ऐवजही जप्त करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी, अनेक दिवसांपासून या पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडे पडले होते. अथणी तालुक्यातील रेडरहट्टी व रायबाग तालुक्यातील अलकनूर येथील दरोडेखोर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रेडरहट्टी येथील राजू बसाप्पा गळतगा (वय 25), संजू बसाप्पा गळतगा (वय 22), उमेश उर्फ पिंटू सदाशिव गड्डी (वय 27), अलकनूर येथील रामचंद्र बसाप्पा बिसनाथ (वय 21), सिद्राम श्रीमंत पाटील (वय 19), जयवंत बसाप्पा तगली (वय 25), आकाश बसाप्पा तगली (वय 19), सुनील शिवशंकर गड्डी (वय 19), महांतेश वसंत गळतगा (वय 29, रडेरहट्टी) आणि शिवानंद रुद्राप्पा शिवगन्नावर (वय 27, रा. रडेरहट्टी) यांना गजाआड केले.

आरोपींना अटक करून पोलिसी खाक्या दाखविताच विविध पोलिस ठाण्याच्या परिसरात 7 चोरीच्या प्रकरणात आपला हात असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून 1 लाख 50 हजाराचे मद्याचे बाॅक्स, 1 लाख 20 हजाराच्या पाच दुचाकी, 2 लाखाची कार असा 4.70 लाखाचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. बेळगाव, बागलकोट जिल्ह्यातही त्यांच्यावर अनेक गुन्हा दाखल झाले आहेत. कोरोनाकाळात पोलिस बंदोबस्तात असल्याने या चोरया झाल्या होत्या. तरीही पोलिसांनी सर्वच दरोडेखोरांना जेरबंद केल्याने जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी पोलिसांचे कौतुक केले. अथणी न्यायालयासमोर सर्व आरोपींना हजर करून गोकाक उपकारागृहात पाठविण्यात आले.

जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक एस. व्ही. गिरीश, अथणीचे मंडल पोलिस निरीक्षक शंकरगौडा बसगौडर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक कुमार हाडकर, शिवराज नायकवडी, काॅन्स्टेबल व्ही. जी. आरेर, सहाय्यक उपनिरीक्षक एच. सी. गडाद, ए. ए. इरकर, पी. बी. नाईक, एम. बी. दोडमनी, पी. सी. गजाद, बी. जे. तळवार, एस. आय. पाटील, एस. एन. ढोबळे, पी. सी. कडगोंद, कुमार नाईक, प्रवीण कांबळे यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

About Belgaum Varta

Check Also

दत्त खुले नाट्यगृहाजवळील पाणी वापरात आणा

Spread the love  निपाणी (वार्ता) : शहरात पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर कोडणी-गायकवाडी येथील खणीतील पाणी उपसा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *