बेळगाव : बेळगाव शहरात पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला होता. 77 घटनांमध्ये जप्त केलेला हा गांजा कडोली गावाजवळील गुंजेनहट्टीजवळ जाळण्यात आला. जप्त गांजा जाळण्यासाठी जेसीबीने खड्डा खणला आणि त्यात तो 366 किलो कोरडा गांजा जाळला.
बेळगाव शहर पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी सीआर निलगार यांच्या सूचनेवरून पोलिस कर्मचार्यांनी गांजा नष्ट केला. इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जाळल्याने गुंजेनहट्टीजवळ धुराचे सम्राज्य होते. वेगवेगळ्या भागांमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेला गांजा मागील अनेक वर्षांपासून पडून होता. अखेर पोलिसांनी तो शुक्रवारी (11 जून) एकत्र करुन जाळला.
