खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा ता. खानापूर येथे ३ जून रोजी जखमी अवस्थेत सापडलेल्या बेवारस इसमाला खानापूर सरकारी दवाखाण्यात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारांती मृत्यू झाला. त्यानंतर इसमाच्या मृत्यूची ओळख पटविण्यासाठी बेळगाव येथील शवगृहात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पोलिसांनी बेवारस मृत्यूदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कदंबा फाऊंडेशन संघटनेचे अध्यक्ष जाॅर्डन गोन्साल्विस यांना संर्पक साधला असता खानापूरात बेवारस मृत्यूदेहासाठी जागा नाही. असे सांगताच बेळगाव शहापूर मोक्षदाम स्मशानभुमीत आठ दिवसानंतर शुक्रवारी दि. ११ रोजी अत्यंसंस्कार करण्यात आले.
यावेळी कदंबा फाऊंडेशन संघटनेचे अध्यक्ष जाॅर्डन गोन्साल्विस, कुमार थंगम खानापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बसनगौडा पाटील, इतराच्या सहकार्याने बेवारस मृत्यूदेहावर अंत्यसंस्कार आले.
जर कुणाला मृतदेहाची ओळख पटवून घेण्याचे असल्यास कदंबा फाऊंडेशन संघटनेचे अध्यक्ष जाॅर्डन गोन्साल्विस, अथवा खानापूर पोलिस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …