खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने तिवोली येथे मास्कचे वितरण करण्यात आले.
मास्क वितरणावेळी सीमालढ्यातील जेष्ठ कार्यकर्ते गोपाळ हेब्बाळकर यांनी खानापूर युवा समितीतर्फे सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले, तसेच यापुढे खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समिती, मराठी भाषिक व युवकांनी एकत्र येत सीमालढ्याला बळकटी द्यावी, असे मत व्यक्त केले.
गावातील सर्व नागरिकांना मास्कचे वितरण करण्यात आले. यावेळी युवा समितीचे किशोर हेब्बाळकर, माजी ग्राम पंचायत सदस्य सहदेव हेब्बाळकर, पोमानी नाळकर, कृष्णा गोरल, महादेव सुतार, महेश हेब्बाळकर, सिद्धाप्पा हेब्बाळकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
