Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे वधू वर महामेळावा उत्साहात

  बेळगाव : लग्न जुळविताना इच्छुक वधू व वर तसेच पालकांनी तडजोड केल्यास अडचणी येणार नाहीत, असे प्रतिपादन मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा मंदिर येथे वधू वर महामेळाव्यात श्री. मरगाळे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे शितल वेसणे, कार्याध्यक्ष शिवराज …

Read More »

काँग्रेसकडून लिंगायत समाजास प्राधान्य, 32 लिंगायतांना उमेदवारी

  विजयपूर : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागेपैकी काँग्रेस पक्षाच्या वतीने 124 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये 32 लिंगायत नेत्यांना उमेदवारी देऊन लिंगायत समाजास प्राधान्य दिले आहे. राज्यातील भाजपा सरकारने पंचमसाली लिंगायत समाजाच्या 2 ए मध्ये समावेश न करता 2 डि असे वेगळे कॅटेगरी निर्माण करुन आरक्षण जरी दिले असले …

Read More »

श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

  खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळुर संचलित श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण ता. खानापूर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. दि. 20/03/2023 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. महादेव गोपाळ मिराशी अध्यक्ष कृषी पत्तीन सोसायटी घोटगाळी होते. कार्यक्रमाचे …

Read More »

दहावी परीक्षेची ३१ मार्चपासून सुरुवात

  परीक्षा केंद्रांवर सुविधा बेळगाव : दहावीची परीक्षा अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. शिक्षण खात्याने परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केंद्रप्रमुखांना करण्यात आली आहे. बेळगाव शैक्षणिक. जिल्ह्यातील १२० परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ३३ हजार १८२ …

Read More »

पाचवी, आठवीची बोर्ड परीक्षा उद्यापासून

  बेळगाव : पाचवी व आठवीच्या बोर्ड परीक्षेला सोमवार (ता. २७) पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. प्रशिक्षण खात्यानेही परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. क्लस्टरनिहाय पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पेपर झाल्यानंतर शाळांना क्लस्टरवर उत्तरपत्रिका वेळेत द्याव्या लागणार आहेत. शिक्षण खात्याने पाचवी …

Read More »

भालके खुर्दला गवतगंजी खाक

  खानापूर : भालके खुर्द (ता. खानापूर) येथे शनिवारी सायंकाळी चार वाजता विद्युत वाहिनीच्या डीपीतील शॉर्टसर्किटमुळे गवतगंजीला आग लागली. या घटनेत शेतकरी निंगाप्पा सिमानी अळवणी यांच्या घरापाठी मागील परसात असलेल्या चार ट्रॅक्टर गवतगंजीला आग लागून ३५ ते ४० हजाराचे नुकसान झाले. विद्युत वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्ममध्ये सतत ठिणग्या उडत असल्याबाबत हेस्कॉमला …

Read More »

ज्योतिर्लिंग देवस्थानाची पालखी उद्या वाडी रत्नागिरीकडे निघणार

  बेळगाव – श्री ज्योतिर्लिंग देवस्थान वाडी रत्नागिरी कोल्हापूर येथे दवणापूर्णिमा यात्रा संपन्न होत आहे. दिनांक पाच एप्रिल रोजी रात्री पालखी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला सालाबादप्रमाणे बेळगाव येथील नार्वेकर गेली येथून पायी जाणारे भक्त पालखी व बैलगाड्यांसह उद्या सोमवार 27 मार्च रोजी दुपारी चार वाजता ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गेलेली …

Read More »

आप्पाचीवाडी फाट्यावर वाहनधारकांची कसून तपासणी

  कोगनोळी : आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक ठिकाणी तपासनाके उभारले आहेत. आप्पाचीवाडी फाटा या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. आडी डोंगराच्या पश्चिमेकडील बाजूस मल्लिकार्जुन डोंगर कर्नाटक-महाराष्ट्राची सीमा असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या सर्व वाहनधारकांची या ठिकाणी कसून तपासणी करण्यात येत आहे. महसूल …

Read More »

कॉंग्रेसची उमेदवारी वशिलेबाजीने : कॉंग्रेस युवा नेते इरफान तालीकोटी यांचा आरोप

  खानापूर : खानापूर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज विद्यमान आमदार अंजली निंबाळकर यांचे नाव जाहिर होताच काँग्रेसचे युवा नेते व इच्छुक उमेदवार इरफान तालीकोटी यांनी ताबडतोब बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली असुन पत्रकारांनी आपण बंडखोरी करणार काय असे विचारले असता ते म्हणाले की, आपण …

Read More »

इलेक्ट्रिकल मर्चंट असो.ची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

  बेळगाव : शहरातील इलेक्ट्रिकल मर्चंट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज शनिवारी हॉटेल संकमच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली. सदर वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी इलेक्ट्रिकल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद पाटील हे होते. सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रामध्ये उपस्थित सर्व सदस्यांनी भाग घेऊन आपले विचार व्यक्त केले. त्याचप्रमाणे अध्यक्ष अरविंद …

Read More »